सुष्मिता म्हणतेय ‘मी 3 वर्षांपासून सिंगल’; एक्स बॉयफ्रेंडचा वेगळाच दावा

सुष्मिता म्हणतेय ‘मी 3 वर्षांपासून सिंगल’; एक्स बॉयफ्रेंडचा वेगळाच दावा

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकताच एक पॉडकास्ट सुरू केला असून त्यात अभिनेत्री सुष्मिता सेन पाहुणी म्हणून उपस्थित राहिली. या मुलाखतीत सुष्मिता तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. रिया आणि सुष्मिता यांच्यात ‘लव्ह लाईफ’विषयीही गप्पा झाल्या. या पॉडकास्टमध्ये सुष्मिताने सांगितलं की ती गेल्या तीन वर्षांपासून ‘सिंगल’ (कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही) आहे. त्याचप्रमाणे हा ब्रेक एंजॉय करत असल्याचंही ती म्हणाली. त्यामुळे रोहमन शॉलसोबत नेमकं तिचं नातं काय आहे, असा प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाला. सुष्मिता आणि रोहमन यांना नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात एकत्र पाहिलं गेलं होतं. आता ‘सिंगल’ असण्याच्या सुष्मिताच्या वक्तव्यावर रोहमनने प्रतिक्रिया दिली आहे.

मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉल याविषयी म्हणाला, “आम्ही तर गेल्या सहा वर्षांपासून एकत्र आहोत. यात नवीन काय आहे? आम्ही नेहमीच एकमेकांचे चांगले मित्र राहिलो आहोत आणि भविष्यातसुद्धा राहू. आमच्यात काहीतरी खास नक्कीच आहे आणि ते सर्वांना दिसून येतं.”

रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्टमध्ये सुष्मिता म्हणाली होती, “आज आता या घडीला आपण बोलत असताना मी हे सांगू इच्छिते की माझ्या आयुष्यात एकही पुरूष नाही. मी बऱ्याच काळापासून सिंगल आहे. नेमकं बोलायचं झाल्यास, तीन वर्षांपासून मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये नाही. सध्याच्या घडीला मला कोणातच रस नाही. ब्रेक घेतल्यामुळे मी खुश आहे, कारण त्याआधी मी जवळपास पाच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते आणि हा बऱ्यापैकी मोठा काळ आहे. सुदैवाने माझ्या आयुष्यात खूप चांगली लोकं मला भेटली आहेत. असेही काही मित्रमैत्रिणी आहेत, ज्यांना मी कोणत्याही क्षणी फोन केला तरी ते माझ्या मदतीला तयार असतील.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

सुष्मिता आणि रोहमन हे एकमेकांना डेट करत होते. मात्र डिसेंबर 2021 मध्ये सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी ब्रेकअप केल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर तिचं नाव माजी आयपीएल चेअरमन ललित मोदीशी जोडलं गेलं होतं. ललित मोदी यांनी अचानक सोशल मीडियावर सुष्मितासोबतचे फोटो पोस्ट केले होते. त्याचसोबत तिला डेट करत असल्याचंही म्हटलं होतं. त्यावर सुष्मिताने कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पुन्हा एकदा सुष्मिता आणि रोहमन यांना विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;