‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत मोठा ट्विस्ट; अप्पी-अर्जुन पुन्हा येतील एकत्र?
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अमोल त्याच्या आई-बाबांना एकत्र आणण्यासाठी जीवापाड मेहनत घेत आहे. अमोल रोज काहीतरी रेखाटत असल्याचं सगळ्यांच्या लक्षात येतं. जेव्हा दिप्या त्याला सतत प्रश्न विचारतो तेव्हा हे स्पष्ट होतं की अमोल त्याच्या वाढदिवसाची चित्रे काढत आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा वाढदिवस!
दरम्यान, अप्पी आणि अर्जुन यांच्यातील जवळीक हळूहळू वाढत आहे. तेव्हा रुपाली आर्याला सांगते की "अप्पी आणि अर्जुनमधील सर्वात मोठी लढाई फक्त एकाच गोष्टीवर असू शकते ती म्हणजे तत्त्वांवर." तिने अर्जुनच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला. रुपाली आणि आर्याने याचा वापर करून दोघांमध्ये तेढ निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
इकडे अमोल त्याचं रेखाचित्र पूर्ण करतो आणि अप्पी आणि अर्जुनला दाखवतो. गेल्या सात वर्षांत त्यांनी काय गमावलं हे दोघांच्या लक्षात येतं. अप्पी आणि अर्जुन दोघांचेही डोळे पाणावतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List