जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या कॅम्पवर हल्ला, एक जवान गंभीर जखमी

जम्मू कश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा लष्कराच्या कॅम्पवर हल्ला, एक जवान गंभीर जखमी

जम्मू कश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका खेडे गावात असलेल्या लष्कराच्य़ा कॅम्पवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राजौरी जिल्ह्यातील सुदूर बुधूल भागातील गुंडा गावातील कॅम्पवर दहशतवाद्यांनी सोमवारी पहाटे साडेतील वाजता अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर जवांनानी देखील त्या दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र हल्ल्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. या चकमकीत एक जवान जखमी झाला. या हल्ल्यानंतर आजुबाजुच्या भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;