सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा 1500 कोटींचा पीएफ, गॅच्युईटी भरलीच नाही; कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा 1500 कोटींचा पीएफ, गॅच्युईटी भरलीच नाही; कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष

गेले अनेक महिने एसटी कर्मचाऱयांचे पीएफ व उपदान या दोन्ही रकमांचा कर्मचाऱयांच्या वेतनातून कापण्यात आलेला सुमारे 1500 कोटींचा हिस्सा ट्रस्टकडे भरण्यात आलेला नाही. साहजिकच ट्रस्टला मिळणारे त्या रकमेवरील व्याज बुडत असून या संस्था अडचणीत सापडल्या आहेत. त्यामुळे त्यांना कोटय़वधी रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर भविष्यात कर्मचाऱयांना निवृत्तीनंतरची देणी मिळण्यात अडचण येणार आहे. राज्यातील मिंधे सरकारच्या या बेफिकिरीमुळे एसटी कर्मचाऱयांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.

भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रकमांचा एसटी कर्मचाऱयांचा स्वतंत्र ट्रस्ट असून यासाठी कर्मचाऱयांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा हिस्सा या ट्रस्टकडे भरणा केला जातो; पण कर्मचाऱयांकडून कपात करण्यात आलेल्या रकमेचा हिस्सा गेले अनेक महिने ट्रस्टकडे भरणा केला नसून ही रक्कम अंदाजे 1500 कोटी रुपये इतकी झाली आहे. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे कोटय़वधी रुपयांचे व्याज ट्रस्टला मिळालेले नाही. त्यामुळे या दोन्ही ट्रस्टसुद्धा अडचणीत सापडल्या आहेत.

सवलत मूल्य रक्कम आगाऊ द्या!

सरकारने सवलत मूल्य रक्कम ही दर महिन्याला एसटीकडून प्रस्ताव गेल्यानंतर न देता एसटी महामंडळाला अॅडव्हान्स द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सरकारकडे केली आहे. वर्षभराची होणारी एकूण 4 हजार 400 कोटी रुपये इतकी सवलत मूल्य रक्कम सरकारकडून आगाऊ दिल्यास हा मुद्दा निकाली निघेल, असेही बरगे म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;