जालन्यातील भाविकाचा केदारनाथ येथे मृत्यू, जिल्हाधिकार्‍यांनी दिली माहिती

जालन्यातील भाविकाचा केदारनाथ येथे मृत्यू, जिल्हाधिकार्‍यांनी दिली माहिती

केदारनाथ येथे आज 21 जुलै रोजी रविवारी सकाळी पावसामुळे दरड कोसळून तीन भाविक ठार तर आठ जखमी झाले आहेत. यात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी येथील एका भाविकाचा समावेश आहे.

या मृतांत अंबड तालुक्यातील गोंदी येथील सुनील महादेव काळे (24) यांचा या समावेश आहे. त्यांच्यासोबत पाथरवाला, शहागड, गोंदी येथील परमेश्वर चव्हाण यांच्यासह 9 व्यक्ती केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले आहेत. जिल्हा प्रशासन त्यांच्यासह मंत्रालय नियंत्रण कक्ष आणि रुद्रप्रयाग आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्याशी संपर्कात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे. दरम्यान सुनिल काळे यांचे गोंदी या येथे कापड दुकान आहे. सुनिल काळेसह गोंदी येथील 10 युवक केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते. त्यातील सुनिल काळे यांचा मृत्यू झाला तर दोघे किरकोळ जखमी आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;