कपिल शर्माच्या शोमधून सुमोना चक्रवर्तीला काढून टाकलं होतं? अभिनेत्रीने सांगितलं सत्य

कपिल शर्माच्या शोमधून सुमोना चक्रवर्तीला काढून टाकलं होतं? अभिनेत्रीने सांगितलं सत्य

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीला ‘द कपिल शर्मा शो’मुळे बरीच लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये ती कॉमेडियन कपिल शर्माच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. मात्र नंतर तिने हा शो सोडला होता. मध्यंतरीच्या काळात सुमोनाविषयी अशा चर्चा होत्या की तिला ‘द कपिल शर्मा शो’मधून काढून टाकण्यात आलं होतं. या चर्चांवर अखेर सुमोनाने मौन सोडलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. त्याचसोबत तिने कपिलच्या नेटफ्लिक्सवरील नव्या शोबद्दलही तिने प्रतिक्रिया दिली आहे.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सुमोना म्हणाली, “हे फारच विचित्र आहे. कारण काही दिवसांपूर्वीच मी एक मुलाखत दिली होती आणि त्यात या चर्चांच्या उलट मी सगळं काही म्हटलं होतं. पण दोन दिवसांनंतर दुसऱ्या मीडिया हाऊसने माझ्याबद्दल वेगळंच काहीतरी लिहिलं होतं. त्यावेळी मी काहीच बोलू शकले नाही, कारण तेव्हा मी रोमानियामध्ये होते.” कपिलच्या शोमधील सुमोनाच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र तरीही तिला शोमधून का काढण्यात आलं, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले होते. मात्र स्वत:हूनच शोमधून बाहेर पडल्याचं सुमोनाने स्पष्ट केलं.

याच वर्षी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ सुरू झाला होता. यामध्येही सुमोना दिसली नव्हती. त्याविषयी सुमोनाने पुढे सांगितलं, “मी हे वारंवार सांगत आलेय की मी ज्या शोचा भाग होती, तो गेल्या वर्षी जुलैमध्ये संपला होता. मी तो शो मध्येच सोडला नव्हता किंवा मला त्यातून काढून टाकण्यात आलं नव्हतं. तो शो जुलैमध्ये संपला होता आणि त्यानंतर आम्ही सगळे कलाकार आपापल्या आयुष्यात पुढे निघालो. कपिल शर्मा आणि माझ्या नात्यात काहीच वितुष्ट आलं नाही. मी सध्या खतरों के खिलाडी हा शो करतेय. कपिलवर मी कशाला नाराज असेन? आम्ही दोघांनी याआधीही एकत्र काम केलंय.”

सुमोनाने 1999 मध्ये आमिर खानच्या ‘मन’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. वयाच्या 11 व्या वर्षी ती पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती. ‘मन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता पण त्यानंतर सुमोनाने इतर कोणत्याही चित्रपटात काम न करता तिचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्यास सुरुवात केली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;