भर कार्यक्रमात तोंडावर पडता पडता वाचली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पतीने…

भर कार्यक्रमात तोंडावर पडता पडता वाचली ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, पतीने…

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रकुल प्रीत सिंहची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही रकुल प्रीत सिंह दिसते. रकुल प्रीत सिंह ही नुकताच धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी पोहोचली होती. फक्तर रकुल प्रीत सिंह हिच नाहीतर सलमान खान, धर्मेंद्र, गोविंदा आणि इतरही बरेच बॉलिवूड कलाकार हे धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलर लाँचमध्ये सहभागी झाले. 

आता या ट्रेलर लाँचमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. अभिनेत्री रकुल प्रीत सिंह या ट्रेलर लाँचमध्ये पती जॅकी भगनानी याच्यासोबत पोहोचली होती. सध्या सोशल मीडियावर रकुल प्रीत सिंह हिचा एक व्हिडीओ आणि काही फोटो हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. 

ट्रेलर लाँचचा कार्यक्रम झाल्यानंतर बाहेर पडत असलेली रकुल प्रीत सिंह ही तोंडावर पडता पडता वाचलीये. रकुल प्रीत सिंह ही जात असतानाच अचानक तिचा पाय घसरतो आणि ती पडत असतानाच तिचा पती जॅकी भगनानी हा तिला पकडतो. यानंतर स्वत:ला सांभाळताना रकुल प्रीत सिंह ही दिसत आहे. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. 

ज्यावेळी रकुल प्रीत सिंह हिचा पाय घसरतो, यावेळी उपस्थित पापाराझी हे हसताना दिसत आहेत. त्यानंतर रकुल प्रीत सिंह ही चांगलीच त्यांच्यावर भडकताना दिसते. रकुल प्रीत सिंह म्हणाली की, यामध्ये हसण्यासारखे काय आहे. यानंतर रागारागात निघून जाताना रकुल प्रीत सिंह ही दिसत आहे. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. 

एकाने या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, इतकी मोठी हिल्स घालण्याची काय गरज आहे. दुसऱ्याने लिहिले की, स्वत:ला व्यवस्थित चालता येत नाही आणि दुसऱ्यांवर चिडत आहे. रकुल प्रीत सिंह ही यावेळी साडीमध्ये ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमामध्ये पोहोचली होती. रकुल प्रीत सिंह ही मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;