आंबेगाव – सात दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद

आंबेगाव – सात दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या बिबट्या अखेर जेरबंद

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जाळीच्या मळ्यात मागील 7 दिवसांपासून हुलकावणी देत असलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांनी ही माहिती दिली.

जाळीचा मळा या परिसरातील शुभम बळीराम मेंगडे यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी गेल्या 7 दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. परंतु बिबट्या सातत्याने हुलकावणी देत होता. अखेरीस रविवारी पहाटेच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला. र

विवारी सकाळी 6 वाजता अक्षय वळसे, अमीर वळसे, दत्ता गायकवाड व संतोष टेमकर यांच्या ही घटना लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने निरगुडसर गावचे सरपंच रवींद्र वळसे पाटील व रामदास वळसे पाटील यांना माहिती दिली. त्यांनी वन विभागाशी संपर्क केले असता वनपाल प्रदिप कासारे, वनरक्षक बी. एच. पोत्रे, रेस्क्यू टीम मेंबर मनोज तळेकर, मिलिंद टेमकर, ऋषिकेश कोकणे, भाऊसाहेब हांडे, दशरथ मेंगडे, दत्तात्रय राजगुरू यांनी धाव घेत पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. या वेळी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले.

पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला असावा असे विकास वळसे व समीर मेंगडे या स्थानिक रहिवाशांनी सांगितले. पकडलेला बिबट्या हा पाच वर्षाचा नर असून तो जास्त आक्रमक दिसून येत आहे व त्याने पिंजऱ्याला वारंवार धडका दिल्यामुळे त्याच्या नाकाला किरकोळ जखम झाली असल्याचे रेस्क्यू टीम मेंबर डॉ. अतुल साबळे यांनी सांगितले. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;