Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा हाहाःकार, चिचपल्लीत दोन तलाव फुटल्याने गाव जलमय
चंद्रपूर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे चिचपल्ली गावातील दोन तलाव फुटल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावातील सुमारे 200 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. पुरामुळे गावकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गेले 48 तास पावसाची संततधार सुरू असून सर्वच तालुक्यांत अतिवृष्टी नोंदवण्यात आली आहे.
पहाटेच्या सुमारास चिचपल्ली गावात असलेले दोन तलाव फुटून संपूर्ण पाण्याचा लोंढा गावात शिरला. यामुळे घरांमधील धान्य, साहित्य आणि गुरेढोरे यांची मोठी हानी झाली आहे. एका शेतकऱ्याच्या 45 शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.
दरम्यान, पुराची माहिती मिळताच प्रशासन तात्काळ गावात हजर झाले. पिडीत नागरिकांची स्थानिक शाळेत राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे केले जात आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List