लग्नानंतरही त्या गोष्टीचा..; दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्यानंतर मिळाला ‘चीटर’चा टॅग, रणबीर कपूरकडून खंत व्यक्त

लग्नानंतरही त्या गोष्टीचा..; दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केल्यानंतर मिळाला ‘चीटर’चा टॅग, रणबीर कपूरकडून खंत व्यक्त

अभिनेता रणबीर कपूरने 2022 मध्ये अभिनेत्री आलिया भट्टशी लग्न केलं. या दोघांना एक मुलगी आहे. रणबीर त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत होता. आलिया भट्टला डेट करण्यापूर्वी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर ‘बॉलिवूड इंडस्ट्रीतला कॅसानोव्हा’ असंही नाव त्याला देण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणबीर याविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. निखिल कामतच्या पॉडकास्टमध्ये रणबीरने थेरपीबद्दलचा त्याचा अनुभव सांगितला. “माझ्याबाबतीत थेरपी कामी आली नव्हती, कारण माझ्या मनात इतरांसमोर व्यक्त होण्याची एक वेगळीच भीती आहे”, असं तो म्हणाला. या मुलाखतीचा ट्रेलर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून त्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. रणबीर पहिल्यांदाच त्याच्या अफेअर्सबद्दल बोलत असल्याने अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या पॉडकास्टच्या ट्रेलरमध्ये रणबीर त्याचा थेरपीचा अनुभव सांगताना दिसतोय. “मला थेरपीशी काही समस्या नाही. पण त्यादरम्यान मला इतरांसमोर मोकळेपणे व्यक्त होता येत नाही”, असं तो म्हणाला. बॉलिवूडमधल्या दोन यशस्वी अभिनेत्रींसोबतच्या अफेअरमुळे मला ‘कॅसानोव्हा’ आणि ‘चीटर’चं लेबल लावण्यात आलं होतं, अशीही खंत त्याने बोलून दाखवली. या गोष्टीचा त्रास अजूनही होतो का, असा प्रश्न विचारला असता त्यावर रणबीरने फक्त स्मित हास्य केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

रणबीर कपूरचं दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ या दोन अभिनेत्रींसोबतच अफेअर खूप चर्चेत होतं. रणबीर आणि दीपिका हे दोघं ‘बचना ए हसीनों’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले. रणबीरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या दीपिकाने तिच्या मानेवर त्याच्या नावाच्या पहिल्या अक्षराचा टॅटूसुद्धा काढला होता. मात्र या दोघांचं नातं फक्त तीन वर्षेच टिकलं. 2010 मध्ये रणबीर आणि दीपिकाचे मार्ग वेगळे झाले. एका मुलाखतीत दीपिकाने ब्रेकअपमागील कारण रणबीरची फसवणूक असल्याचं म्हटलं होतं. दीपिकानंतर रणबीरने अभिनेत्री कतरिना कैफला डेट केलं होतं. या दोघांचं नातं जवळपास 6 वर्षे टिकलं होतं.

2022 मध्ये रणबीरने आलिया भट्टशी लग्न केलं. तर दीपिकाने 2018 मध्ये अभिनेता रणवीर सिंहशी लग्नगाठ बांधली. कतरिनाने 2021 मध्ये अभिनेता विकी कौशलशी लग्न केलं. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नसोहळ्यात या सगळ्यांना एकत्र पाहिलं गेलं होतं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;