गर्लफ्रेंडने फोनचा पासवर्ड मागताच तरुणाची समुद्रात उडी

गर्लफ्रेंडने फोनचा पासवर्ड मागताच तरुणाची समुद्रात उडी

मोबाईलचा पासवर्ड हा अनेकांसाठी जीव की प्राण ठरत आहे. पासवर्ड फक्त स्वतःलाच माहिती हवा, यासाठी अनेक तरुण आणि तरुणी वाट्टेल ते करायला तयार असतात. मोबाईलचा पासवर्ड गर्लफ्रेंडलाही कळायला नको, याची अनेक बॉयफ्रेंड विशेष काळजी घेत असतात. याचाच प्रत्यय अमेरिकेतील फ्लोरिडा येथे आला. एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडकडे मोबाईलचा पासवर्ड मागितला. परंतु, तरूणाने पासवर्ड देण्यास नकार दिला. तरुणीने पुन्हा पासवर्ड मागितल्याने या तरुणाने थेट समुद्रात उडी घेतली. जवळपास 7 मिनिटे पोहल्यानंतर तरूण समुद्राच्या किनाऱयावर सुरक्षीत पोहोचला. त्यानंतर  पोलिसांनी या तरुणाला अटक केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

पोलिसांना समुद्र किनाऱयावर एक संशयित बोट दिसली. पोलिसांनी या दोघांकडे आपले ओळखपत्र मागितले. परंतु, तरुणाने ते दाखवण्यास नकार दिला. मुलीने मुलाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो ऐकत नव्हता. मुलीने बॉसला फोन करण्यासाठी त्याचा फोन घेतला व पासवर्ड मागितला. परंतु, मुलाने थेट समुद्रात उडी घेतली, असे व्हिडीओत दिसते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;