कांदाटीतील 16 गावांसाठी तीन रुग्णवाहिका, आरोग्य सेवेचा प्रश्न सुटणार!
कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी असलेल्या 2 प्राथमिक आरोग्य केंद्रांना वेगवेगळ्या प्रकारच्या तीन रुग्णवाहिका मंजूर झाल्या आहेत. एका रुग्णवाहिकेचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सकांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या प्रयत्नांमुळे कांदाटीतील आरोग्यसेवेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.
कांदाटी खोऱ्यातील 16 गावांसाठी रुग्णकाहिका मंजूर करावी, यासाठी सुशांत मोरे यांनी उपोषण केले होते. यानंतर केंद्र व राज्य सरकारकडे तातडीने प्रस्ताक पाठवून रुग्णवाहिकेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी तापोळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे 102 क 108 ची रुग्णवाहिका, तळदेव प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी 102ची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. तसेच राज्यस्तराकर 108च्या रुग्णवाहिकेची मागणी केल्याचे पत्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी सुशांत मोरे यांना दिले आहे. मोरे यांच्या रेट्यामुळे कांदाटी परिसरातील आरोग्यसेवेचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मोरेंची मागणी
मुख्यमंत्री हे शुक्रवारी सातारा जिल्हा दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांच्या गैरसोयीचा विचार करून त्यांनी 108ची रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध करून द्यावी. ग्रामस्थांच्या या जिव्हाळ्याच्या विषयात मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष घालावे, अशी मागणी सुशांत मोरे यांनी केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List