औषधांच्या नावाखाली बनावट गोवा दारूची तस्करी; उत्पादन शुल्कची कारवाई, 87 लाखांचा मुद्देमाल जप्त

औषधांच्या नावाखाली बनावट गोवा दारूची तस्करी; उत्पादन शुल्कची कारवाई, 87 लाखांचा मुद्देमाल जप्त

तालुक्यातील लोहारवाडी गावच्या हद्दीत कराड-चांदोली रोडवर औषधांच्या नावाखाली गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडला. याप्रकरणी ट्रक चालकास अटक केली आहे. त्याच्याकडून 87 लाख 11 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बनवारी राम (वय 33, रा. जोधपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभाग सातारचे अधीक्षक वैभव वैद्य यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभाग कराडच्या पथकाला मिळालेल्या बातमीनुसार लोहारवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत कराड-चांदोली रोडवर दहा चाकी ट्रक गोवा बनावटीची दारूची तस्करी करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने लोहारवाडी गावच्या हद्दीत ट्रक थांबवून ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये 87 लाख 11 हजार किमतीची गोवा राज्यात निर्मित व विक्री असलेले रॉयल ब्ल्यू मार्ट व्हिस्कीच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 15000 सीलबंद बाटल्या मिळवून आल्या. याप्रकरणी ट्रकचालक बनवारी राम याला अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक पी. आर. गायकवाड, विनोद बनसोडे, महिला जवान राणी काळोखे यांनी केली. दुय्यम निरीक्षक डॉ. उमा पाटील तपास करीत आहेत.

सातारा जिह्यामध्ये बनावट दारू तसेच हातभट्टी दारूनिर्मिती विक्री वाहतूक तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या दारूची निर्मिती विक्री व वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ या कार्यालयास देण्यात यावी, असे आवाहन अधीक्षक वैभव वैद्य यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;