रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; राजस्थानमध्ये मालवाहू गाडीचे 3 डब्बे रुळावरून घसरले

रेल्वे अपघातांची मालिका सुरुच; राजस्थानमध्ये मालवाहू गाडीचे 3 डब्बे रुळावरून घसरले

देशात रेल्वे अपघातांची मालिका सुरुच आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड-दिब्रूगड एक्सप्रेसच्या 3 एसीसह तब्बल 15 डबे रुळावरून घसरल्याची घटना ताजी असतानाच राजस्थानच्या अलवर शहराजवळ मालवाहू गाडीचे रेल्वेचे डब्बे रुळावरून घसरले आहेत. अलवर रेल्वे स्थानकावरून रेवाडीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या मालवाहू गाडीचे 3 डब्बे रुळावरून घसरल्याने मथुरा-अलवर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही मालवाहू गाडी रुळावरून घसरली. याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि जयपूरचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिष गोयल घटनास्थळी दाखल झाले आहेत. घसरलेले डब्बे पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. लवकरच या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्ववत होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मथुराकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर हा अपघात झाल्याने गुरुपौर्णिमेनिमित्त डीग जिल्ह्यात आयोजित जत्रेसाठी निघालेल्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे जत्रेसाठी चालवण्यात येणारी विशेष रेल्वेही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे अलवर स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाल्याची माहिती मिळतेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;