विधानसभेपूर्वी धर्मवीर 2, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कथा…, चित्रपटानंतर राजकारण रंगणार

विधानसभेपूर्वी धर्मवीर 2, एकनाथ शिंदे यांच्या बंडाची कथा…, चित्रपटानंतर राजकारण रंगणार

कोणाची तरी आघाडी करुन तुम्ही विकला तो भगवा रंग…वीस वर्षांपूर्वी या ठाण्यात एक दाढीवाला बेसावध होता, पण जाताना दुसऱ्या दाढीवाल्यास सावध करुन गेला…असे धर्मवीर 2 चित्रपटामधील ट्रेलरचे संवाद राज्यातील विधानसभेतील राजकारणाची दिशा ठरवणार आहे. या चित्रपटाच्या संवादावरुन एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ चित्रपटातून उलघडणार असल्याचे दिसत आहे. हा चित्रपट फक्त मराठी भाषेपर्यंतच नाही तर हिंदीत येत असल्याने देशभरात राजकीय वादळ निर्माण होणार आहे. हा चित्रपट येत्या ९ ऑगस्टला रुपेरी पडद्यावर येणार आहे. त्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत.

धर्मवीर 2 चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग मुंबईत झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक कलावंत हजार होते. बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या हस्ते चित्रपटाचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी चांगली राजकीय फटकेबाजी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शिंदे साहेबांसारखा नेता घडवला आणि हजारो अनुयायी घडवणारे आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारीत धर्मवीर चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. दिघे साहेबांच्या शिकवणीप्रमाणे शिंदे साहेब काम करत आहेत. महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे आणि बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील.

मला देखील चित्रपट काढायचा…

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडावर भाष्य केले. विचारांशी गद्दारी झाली म्हणून ते सरकारमधून बाहेर पडले. त्यांना गद्दार म्हणून हिणवले गेले. पण त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने स्वीकारले आहे. धर्मवीर 2 ट्रेलर आपण पाहिला आहे. यामुळे मला देखाली आता सिनेमा काढायचा आहे. पण मी जेव्हा सिनेमा काढेन त्यावेळी अनेकांचे खरे चेहरे समोर येतील. हा सिनेमा कधी बघायला मिळेल यांची वाट पाहत आहे.

धर्मवीर 2 हिट होणार आहे. त्यामुळे आता धर्मवीर 3 आणि 4 भागांची तयारी करा,असे फडणवीस यांनी सांगितले. नऊ ऑगस्ट क्रांती दिन धर्मवीर दोन मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपटाचे प्रदर्शन होत आहे. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काढलेला नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

धर्मवीर 2 बदल उत्सुक्ता वाढली

धर्मवीर 2 चित्रपटासंदर्भात प्रेक्षकांमध्ये उत्सुक्ता वाढली आहे. या चित्रपटाचा टीजर काही दिवसांपूर्वी लॉन्च झाला. त्याला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर धर्मवीर 2 चा टेलर लाँच करण्यात आहे. या चित्रपटातील टेलरवरुन कथानक, कलाकार यविषयाची लोकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;