इंद्राणी मुखर्जीच्या युरोप वारीला सीबीआयचा विरोध
शीना बोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीच्या युरोप वारीला परवानगी देणाऱया विशेष न्यायालयाच्या आदेशाविरोधात सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
इंद्राणी मुखर्जी जामिनावर आहे. स्पेन व युकेला जाण्यास विशेष न्यायालयाने तिला परवानगी दिली. भारतीय दुतावासात हजेरी लावावी. तेथील वास्तव्याचा तपशील तपास यंत्रणेला द्यावा. दोन लाख रुपये जमा करावेत, असे आदेशही न्यायालयाने इंद्राणीला दिले. हे आदेशच बेकायदा आहेत, असा दावा करत सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List