तिलारीच्या पुरात ग्रामस्थ अडकले

तिलारीच्या पुरात ग्रामस्थ अडकले

दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला असताना शुक्रवारी दुपारनंतर तिलारी नदीला मोठय़ा प्रमाणात पाणी आले. यामुळे तिलारी नदीवर बांधण्यात आलेला घोटगे, परमे, साटेली, भेडशी गावांना जोडणारा पूल पुराच्या पाण्याखाली गेला. यामुळे साटेली, भेडशी, परमे, घोटगे गावांचा संपर्क तुटला. यामुळे काही ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी अडकून पडले. काही जणांनी तिलारी कालव्याच्या रस्ताचा आधार घेत चार ते पाच किलोमीटर फेरा मारून घर गाठले.

गरज असेल तरच घराबाहेर पडा

उत्तर बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  मुंबई वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढच्या काही तासांत मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिह्यात संततधार कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे 19 ते 21 जुलैदरम्यानच्या काळात कोकण, पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय घाट क्षेत्रातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. शिवाय घाट क्षेत्रामध्ये मध्यम ते मुसळधार आणि काही ठिकाणांवर अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;