पाऊस थांबेना! आजही मुंबईसह कोकणात अतिमुसळधार

पाऊस थांबेना! आजही मुंबईसह कोकणात अतिमुसळधार

मुंबईकोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून बरसणाऱया पावसाचे धुमशान सुरूच असून आजही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू राहिलीकोकणातील अनेक नद्यांनी इशारा पातळी पार केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, तर मुंबईतही जोरदार पावसाचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला. सकाळच्या सत्रात तिन्ही मार्गांवरील लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे कामावर जाणाऱया चाकरमान्यांचे हाल झाले.

हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी सकाळपासून राज्याच्या विविध भागांसह मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. मुंबई शहर आणि उपनगरासह पुणे, सातारा, कोल्हापूर ते कोकणपट्टय़ामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईसह वसई, विरार या भागांतही रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून हवामान विभागाने पालघर जिह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. तसेच ठाणे, कल्याण आणि डोंबिवली उपनगरातही जोरदार पाऊस होत आहे. पावसामुळे मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. अंधेरी सब वे बंद करावा लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाल्याने या ठिकाणची वाहतूक एस. व्ही. मार्गावर वळवण्यात आली. मार्गात पाणी साचल्याने बेस्ट मार्गात बदल करावा लागला. मालाड सब वे, एलबीएस मार्गावर पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. भांडुप, घाटकोपर, दादर टीटी, लालबाग, भायखळा, अंधेरी, मालाड, वांद्रे, नाना चौक, गोवंडी- मानखुर्द, चेंबूर शेल कॉलनी, चुनाभट्टी, शीव गांधी मार्पेट,  वडाळा आदी सखल भागांत पाणी साचले. द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूककाsंडी झाली. त्यामुळे अनेक प्रवाशांना कामाच्या ठिकाणी जाण्यास विलंब झाला. दुपारनंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली, मात्र रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला.

या जिह्यांना हवामान खात्याचा इशारा मुसळधार ते अतिमुसळधार

ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, नांदेड, अमरावती, गडचिरोली, नागपूर, वर्धा.

अतिवृष्टी

मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर, पालघर, कोल्हापूर, पुणे.

वादळी वाऱयासह पाऊस

धुळे, जळगाव, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ.

बेस्टचे मार्ग वळवले, वेळापत्रकात बदल

जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने व शीतल सिनेमा मार्गावर पाणी साचल्याने बस मार्ग क्रमांक 7, 302, 303, 517, 322 मगन नथुराम रोड, काळेमार्गे जुना आग्रा रोड कमानीमार्गे वळवण्यात आल्या. तसेच आरे युनिट क्रमांक 22 येथे पाणी साचल्यामुळे बस क्रमांक 460, 488 व्होई सीप्झ-मरोळ मरोशी दोन्ही दिशांनी वळविण्यात आल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;