मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ब्लॉक
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत सीएसएमटी-वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल आणि सीएसएमटी-वांद्रे, गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार आहेत. कुर्ला-पनवेलदरम्यान ब्लॉक कालावधीत 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालविण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील ब्लॉक कालावधीत प्रवाशांना मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List