सलमान खानवर गोविंदाचे मोठे कर्ज, अखेर भाऊ सोहेलच्या मदतीने… नेमकं काय आहे प्रकरण?

सलमान खानवर गोविंदाचे मोठे कर्ज, अखेर भाऊ सोहेलच्या मदतीने… नेमकं काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिली आहेत. विशेष म्हणजे सलमान खान याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कायमच धमाका करताना दिसतात. सलमान खानचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सलमान खान याने त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार बघितले आहेत. एक काळ होता, ज्यावेळी त्याचे चित्रपट फ्लॉप जाताना दिसले. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता गोंविदा हा सलमान खान याच्या मदतीला धावून आला. हेच नाहीतर मध्यरात्री फोन करत एका चित्रपट घेण्यासाठी सलमानने गोविंदाला आग्रह केला आणि विशेष म्हणजे गोविंदाच्या म्हणण्यावर सलमान खानला चित्रपटात घेण्यात देखील आले.

या चित्रपटात सलमान खान याने लव गुरुचे पात्र साकारले होते. गोविंदा हा शिष्यच्या भूमिकेत दिसला. 20 जुलै 2007 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. डेव्हिड धवन दिग्दर्शित आणि सोहेल खान आणि पराग संघवी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. फक्त गोविंदा आणि सलमान खान हेच नाहीतर लारा दत्ता, कतरिना कैफ, अली हाजी, दीपशिखा नगापाल हे कलाकार देखील चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत धमाका करताना दिसले.

विशेष म्हणजे सलमान खान याच्यावर गोविंदाचे मोठे कर्ज होते. ज्यावेळी सलमान खानचे चित्रपट एका मागून एक फ्लॉप जात होते. त्यावेळी सलमान खानने गोविंदाला फोन करून त्याला जुडवा चित्रपटात घेण्याची विनंती केली. जुडवा हा चित्रपट 7 फेब्रुवारी 1997 ला रिलीज झाला. सलमान खाने गोविंदाला म्हटले की, माझ्याकडे सध्या काम नाहीये आणि मला जुडवा चित्रपटाची स्टोरी देखील आवडलीये. त्यानंतर पुढे दुसऱ्या दिवशी गोविंदा डेव्हिड यांना भेटला आणि सलमान भाईचे नाव फायनल केले.

पार्टनर चित्रपटात गोविंदाला घेऊन सलमान खान याने त्याच्यावरील कर्ज फेटले. अभिनेता गोविंदा याने मोठा काळ चित्रपटामध्ये गाजवला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गोविंदा हा चित्रपटांपासून दूर आहे. सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विशेष म्हणजे सलमान खानच्या या चित्रपटाने मोठा धमाका देखील केला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;