भाजपचे केंद्रीय मंत्री अपघातात जखमी, डोक्याला दुखापत, ताफ्यातील कारची जोरदार धडक

भाजपचे केंद्रीय मंत्री अपघातात जखमी, डोक्याला दुखापत, ताफ्यातील कारची जोरदार धडक

केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशातील पिलीभीत मतदारसंघाचे भाजपचे खासदार जितीन प्रसाद हे अपघातात जखमी झाले आहेत. केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद हे पिलीभीत या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी मंत्री जितीन प्रसाद यांची कार त्यांच्यात ताफ्यातील एका कारला धडकली. यात जितीन प्रसाद यांच्यासह त्यांचा पीए आणि खानसामा जखमी झाले. यानंतर मंत्री जितीन प्रसाद यांनी अपघातग्रस्त कार तिथेच सोडली आणि दुसऱ्या वाहनातून रवाना झाले.

हा अपघात मझोला-विज्टी रस्त्यावर बहरुआ गावात झाला. या अपघातात जितीन प्रसाद यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. ताफ्यातील कार वेगात असल्याने जोरदार धडक बसली. या अपघातात मंत्री जितीन प्रसाद यांच्या कारचे मोठे नुकसान झाले.

मंत्री जितीन प्रसाद हे आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यात असलेल्या एस्कॉर्ट कारने अचानक ब्रेक लावला. त्यामागे असलेली जितीन प्रसाद यांची कारही थांबली. पण मागून येणाऱ्या कारच्या चालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही आणि त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात मंत्री जितीन प्रसाद हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्या डोक्याला किरकोळ जखम झाली. या अपघातानंतर मंत्री दुसऱ्या कारने आपल्या कार्यक्रम स्थळाकडे रवाना झाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;