Yavatmal News: यवतमाळ पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडवर, सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका

Yavatmal News: यवतमाळ पोलीस अधीक्षक अ‍ॅक्शन मोडवर, सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाईचा धडाका

यवतमाळच्या पोलीस अधीक्षकांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाईचा दंडुका उगारला आहे. मागील दीड वर्षांपासून कारवाईचा धडाका लावण्यात आला असून, सहा गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्याचा बडगा उगारण्यात आला. संघटीत गुन्हेगारीच्या या कायद्याअंतर्गत 45 गुंडांना गजाआड केले आहे. तसेच एमपीडीए कायद्यांतर्गत 39 गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. आतापर्यंत 137 जणांच्या तडीपारीचा प्रस्ताव दिला आहे तर 47 जणांना तडीपार केले आहे.

जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे चित्र आहे. भररस्त्यात हत्या करण्याइतपत गुन्हेगारांची मजल गेली आहे. टोळीयुद्धही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी टोळ्यांद्वारे रक्तपात घडवला जात आहे. अल्पवयीन मुलेही गुन्हेगारीकडे वळली आहेत. अल्पवयीन मुलांना मिळणाऱ्या कायद्याच्या संरक्षणाचा गैरफायदा घेतला जात आहे. संघटित गुन्हेगारीच्या नव्या मोडस ऑपरेंडीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत.

धडक कारवाई मोहिमेबाबत पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सांगितले की, संघटित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आम्ही एमपीडीए, मोक्का यासारख्या कठोर कायद्यांचा दणका देत आहोत. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तडीपारीसारख्या प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत. जिल्ह्यात गांजा विक्री व सेवन करणारे नशेबाजही आमच्या रडारवर आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत, असे डॉ. बनसोड यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;