Naseeruddin Shah : नसीरुद्दीन शाह यांनी किती पाकिस्तानी चित्रपटात काम केलं माहितीय का?
नसीरुद्दीन शाह यांनी फक्त बॉलिवूडच नाही, अनेक पाकिस्तानी चित्रपटातही काम केलय. बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये नसीरुद्दीन शाह यांचा समावेश होतो. ते मागच्या 5 दशकापासून फिल्म इंडस्ट्रीचा भाग आहेत.
1975 साली रिलीज झालेला निशांत हा त्यांचा डेब्यु सिनेमा होता. त्यानंतर त्यांनी 100 पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केल्या. बॉलिवूड सोबतच नसीरुद्दीन शाह यांनी पाकिस्तानी चित्रपटात सुद्धा काम केलय. हे तुम्हाला माहित आहे का?.
20 जुलै आज त्यांचा 75 वा वाढदिवस आहे. या निमित्ताने जाणून घेऊया, त्यांनी कुठल्या पाकिस्तानी चित्रपटात काम केलय. या लिस्टमध्ये पहिला सिनेमा आहे, 2007 साली रिलीज झालेला 'खुदा के लिए' सिनेमा. या पिक्चरमध्ये नसीरुद्दीन शाह यांनी मौलान वलीचा रोल केलेला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List