मलायका अरोराचे मिस्ट्री मॅनसोबत खास क्षण, अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाला, ‘गरजेचं नाही…’

मलायका अरोराचे मिस्ट्री मॅनसोबत खास क्षण, अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट; म्हणाला, ‘गरजेचं नाही…’

गेल्या काही दिवसांपासून मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचे ब्रेकअप झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. दरम्यान, ब्रेकअपच्या चर्चा रंगत असताना, मलायका सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसली. अभिनेत्रीने सुट्ट्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये असलेल्या मिस्ट्री मॅनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आता मलायका पुन्हा मुंबईत परतली आहे. याच दरम्यान, अर्जुन याने सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं आहे.

अर्जुन कपूर याने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये अर्जुन कपूर म्हणतोय, ‘सकारात्मक राहाण्याचा अर्थ असा नाही की सर्वकाही ठिक होवून जाईल… पण एक गोष्ट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. परिस्थिती कशीही असली तरी चालेल, तुम्ही ठिक असलायला हवे…’ असं अभिनेता म्हणाला आहे. अशात अर्जुन याची ही क्रिप्टिक पोस्ट नक्की कोणासाठी होती असा प्रश्न देखील चाहते विचारत आहेत… सध्या सर्वत्र फक्त आणि अर्जुन – मलायका यांच्या नात्याची चर्चा रंगली आहे.

सांगायचं झालं तर, मलायका हिचा मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जुन याने पोस्ट शेअर केली आहे. मलायका अरोरा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सध्या अभिनेत्रीने मिस्ट्री मॅनसोबत पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मिस्ट्री मॅनचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. फोटोनंतर अर्जुन – मलायकाचं नातं देखील चर्चेत आलं आहे.

अर्जुन कपूरच्या बर्थडे पार्टीतून गायब मलायका अरोरा?

नुकताच अर्जुन कपूर याचा वाढदिवस झाला. वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्याच्या घरी पार्टी ठेवण्यात आली होती. वांद्रे येथील राहात्या घरी अर्जुन कपूर याच्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्याने कुटुंबिय आणि मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला.

अभिनेत्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याच्या घरी पोहोचले होते. पण अभिनेत्री मलायका अरोरा मात्र पार्टीतून गायब होती. शिवाय मलायका हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून अर्जुन याला शुभेच्छा देखील दिल्या नाहीत.

अर्जुन – मलायका यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 2019 मध्ये मलायका – अर्जुन यांनी सर्वांसमोर नात्याची घोषणा केली. 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अर्जुन – मलायका यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;