कोस्टल रोडलगतच्या जागा हिरव्यागार करा! कंत्राटदारांपेक्षा मुंबईकरांचे ऐका, आदित्य ठाकरे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

कोस्टल रोडलगतच्या जागा हिरव्यागार करा! कंत्राटदारांपेक्षा मुंबईकरांचे ऐका, आदित्य ठाकरे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

शिवसेना पक्षप्रमुख,  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार साकार होत असलेल्या कोस्टल रोडलगतच्या जागांचे हरित संवर्धन करून त्या हिरव्यागार करा, अशी विनंती शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिका आयुक्तांना केली.

आदित्य ठाकरे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘कोस्टल रोड’ हा केवळ शहराच्या वाहतुकीच्या पायाभूत सुविधांचाच नव्हे, तर शहराच्या लँडस्केपचाही कायापालट करणारा होता. जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रक आणि मोठय़ा मोकळय़ा हिरव्यागार जागा असा मुंबईकरांसाठीचा समृद्ध प्रकल्प होता. शिवाय, पर्यावरणपूरक उपायांमधून हवामान बदलाला रोखणारा आणि पर्यावरणाची काळजी घेणारा प्रकल्प ठरत होता, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

राखून ठेवलेल्या निधीतूनच हा प्रकल्प व्हावा

z कोस्टल रोडसाठी नियोजित असलेल्या आणि राखून ठेवलेल्या निधीतूनच हा प्रकल्प झाला पाहिजे, असा आग्रहही आदित्य ठाकरे यांनी पत्रात व्यक्त केला आहे. हा शहरातील प्रकल्प आहे आणि संपूर्णपणे मुंबई महानगरपालिकेने राबवलेला आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका रेसकोर्सवरील खासगी तबेल्यांवर 100 कोटी खर्च करणे टाळून तो निधी या प्रकल्पासाठी वापरू शकते, असा उपायही आदित्य ठाकरे यांनी सुचवला आहे. कोस्टल रोडलगतच्या जागांचे नियोजन कशा प्रकारे व्हावे याबद्दल कंत्राटदारांचे नव्हे, तर मुंबईकरांचे म्हणणे ऐकले जाईल, अशी अपेक्षाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधी, रहिवाशांकडून सूचना मागवा

कोस्टल रोड दक्षिण मुंबई क्षेत्रातून जातो. त्यामुळे दक्षिण मुंबईचे खासदार तसेच वरळी आणि ताडदेवचे आमदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, रहिवाशी संस्था, समुदाय यांच्याकडून कोस्टल रोडलगतच्या जागांचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल याबद्दल सूचना मागवाव्यात, असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय तज्ञ, पर्यावरण संस्थांची मदत घ्या

z वरील सर्व बाबी लक्षात घेऊन, कोस्टल रोडच्या वाहतूक वगळता इतर ठिकाणांचे हरित संवर्धन करत उत्तम प्रकारे लँडस्केप कसे करता येईल हे ठरवण्यासाठी आम्ही पूर्वी नियोजित केल्यानुसार जागतिक स्तरावरील स्पर्धा आयोजित करा. या कामासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तज्ञांची व पर्यावरणासाठी काम करणाऱया संस्थांची मदत घ्या, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;