लोकशाहीत पोलिसांचेच राज्य असल्याचे भासवू नका! हायकोर्टाने मिंधे सरकारला फटकारले

लोकशाहीत पोलिसांचेच राज्य असल्याचे भासवू नका! हायकोर्टाने मिंधे सरकारला फटकारले

खटला सुरू करताच आरोपींना दीर्घकाळ कोठडीत ठेवणाऱया पोलिसांवर शुक्रवारी उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. कच्चा कैद्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याच्या पोलिसांच्या मानसिकतेचा न्यायालयाने समाचार घेतला. तसेच लोकशाहीत फक्त पोलिसांचे राज्य असल्याचे भासवू नका, अशी सक्त ताकीद देत न्यायालयाने मिंधे सरकारचे कान उपटले.

खटला सुरू होण्याआधी साडेसात वर्षे कोठडीत असलेल्या कार्तिक प्रसादने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने त्याला जामीन मंजूर केला. महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायद्याच्या तरतुदीअंतर्गत जेवढी शिक्षा होऊ शकते, त्या शिक्षेचा निम्मा अवधी आरोपी दोषी सिद्ध होण्याआधीच कोठडीत कैद आहे. असे असताना त्याच्या जामिनावर पोलिसांनी आक्षेप घेतला. सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी जामिनाला चार आठवडय़ांची स्थगिती द्या, अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यावर खंडपीठ संतप्त झाले आणि पोलिसांची कानउघडणी केली.

नेमके प्रकरण काय?

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार्तिक प्रसाद व त्याच्या पत्नीने अनेक लोकांना पैसे गुंतवण्यासाठी 180 टक्के परताव्याचे प्रलोभन दाखवले व 35 कोटी रुपयांची फसवणूक केली. एकटय़ा तक्रारदाराला 9 कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी प्रसादला फेब्रुवारी 2017 मध्ये अटक केली होती. त्याला डिसेंबर 2017 मध्ये सशर्त जामीन मंजूर झाला होता. मात्र फसवणूक केलेली रक्कम जमा करण्याच्या अटीची पूर्तता न केल्यामुळे तो साडेसात वर्षे तुरुंगात राहिला.

न्यायालयाचे निरीक्षण

खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा संदर्भ देत निरीक्षणे नोंदवली. खटला सुरू न करता आरोपीला दीर्घकाळ तुरुंगात ठेवणे हा राज्यघटनेच्या अनुच्छेद 21 मधील तरतुदींवर घाला आहे. लोकशाहीत फक्त पोलिसांचेच राज्य चालणार असल्याची मानसिकता सरकारला ठेवता येणार नाही. पोलीस नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणू शकत नाहीत, असे न्यायालयाने नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;