चाकरमान्यांना ‘बाप्पा’ पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष फेऱया, उद्यापासून आरक्षण सुरू

चाकरमान्यांना ‘बाप्पा’ पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेकडून 202 विशेष फेऱया, उद्यापासून आरक्षण सुरू

गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱया नियमित गाडय़ांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाल्याने प्रतीक्षा यादीवरील चाकरमान्यांना हिरमोड झाला. आता चाकरमान्यांना बाप्पा पावला असून कोकण रेल्वे प्रशासनातर्फे गणेशोत्सवात सात विशेष गाडय़ांच्या तब्बल 202 फेऱया चालविण्यात येणार आहेत. उद्या, रविवारपासून प्रवाशांना तिकिटाचे आरक्षण करता येणार आहे.

सीएसएमटीसावंतवाडी 

1 ते 18 सप्टेंबर या कालावधीत गाडी क्र. 01151/01152 च्या 36 फेऱया धावणार आहेत. सीएसएमटी येथून ही गाडी रात्री 12.20 वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी 2.20 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. दुपारी 3.10 वाजता सावंतवाडी येथून सुटून दुसऱया दिवशी पहाटे 4.35 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.

सीएसएमटीरत्नागिरी

1 ते  18 सप्टेंबर दरम्यान गाडी क्र. 01153/01154 च्या 36 फेऱया होतील. सीएसएमटी  येथून सकाळी 11.30 वाजता सुटून रात्री 8.10 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. रत्नागिरीतून पहाटे 4 वाजता सुटून दुपारी 1.30 वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

एलटीटीकुडाळ

1 ते  18 सप्टेंबरला गाडी क्र. 01167/01168 च्या 36 फेऱया होतील. ही गाडी एलटीटी येथून रात्री 9 वाजता सुटून दुसऱया दिवशी सकाळी 9.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ येथून सकाळी 12 वाजता सुटून रात्री 12.40 वाजता एलटीटी ला पोहोचेल.

एलटीटीसावंतवाडी

1 ते 18 सप्टेंबरला गाडी क्र. 01171/01172 च्या 36 फेऱया होतील. एलटीटीवरून गाडी सकाळी 8.20 वाजता सुटून रात्री 9 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. सावंतवाडी येथून रात्री 10.10 वाजता सुटून सकाळी 10.40 वाजता एलटीटीला पोहोचेल.

एलटीटीकुडाळ

गाडी क्र. 01185/01186 च्या 16 फेऱया 2 ते 18 सप्टेंबरला सोमवार, बुधवार व शनिवारी धावणार आहे. एलटीटी येथून रात्री 12.45 वाजता सुटून सकाळी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. कुडाळ येथून सायंकाळी 4.30 वाजता सुटून पहाटे 4.50 वाजता एलटीटीला पोहोचेल.

एलटीटीकुडाळ स्पेशल

01165/01166 ही गाडी 3, 10, 17 सप्टेंबरला धावेल. 12.45 वाजता एलटीटी येथून सुटेल आणि सकाळी 12.30 वाजता कुडाळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात संध्याकाळी 4 ः 30 वाजता सुटेल आणि मध्यरात्री 4ः50 वाजता एलटीटीला येथे पोहोचेल.

दिवाचिपळूण मेमू स्पेशल (36 फेऱया

दिवा-चिपळूण मेमू स्पेशल यंदाही स्पेशल 1 ते 18 सप्टेंबरला धावणार आहे. दिवा येथून सकाळी 7.15 वाजता सुटून दुपारी 2 वाजता चिपळूणला पोहोचेल. तेथून दुपारी 3 वाजता सुटून रात्री 10.50 पोहोचेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;