तळवडेतील थर्मोव्हेरिटा कंपनी सील; पिंपरी-चिंचवड पालिकेची कारवाई

तळवडेतील थर्मोव्हेरिटा कंपनी सील; पिंपरी-चिंचवड पालिकेची कारवाई

पालिकेचा कर थकविल्याबद्दल खेडकर कुटुंबियांची तळवडे येथील थर्मोव्हेरिटा प्रायव्हेट लि. कंपनीला महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने शुक्रवारी (दि. 19) सील ठोकले. या कंपनी संचालकाकडे महापालिकेचा दोन लाख 77 हजार रुपयांची कराची थकबाकी आहे.

तळवडे गावठाण, ज्योतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. ही कंपनी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. खेडकर यांना वायसीएम रुग्णालयातून 2022 मध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यांचा डाव्या गुडघ्याला सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्व असल्याचे संबंधित प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खेडकर यांनी तळवडेतील थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड कंपनीचा पत्ता दिला होता. ही कंपनी म.दि. खेडेकर यांच्या नावाने आहे.  महापालिकेने यासंदर्भातची सर्व कागदपत्रे तपासली आहेत. कंपनीमार्फत 2009 पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर 2022 मध्ये भरण्यात आला. त्यानंतर कर भरला नाही.

कंपनीकडे दोन लाख 77 हजार 781 रूपयांचा कर थकित आहे. त्यामुळे नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने करण्यात आली. कारवाईवेळी प्रशासन अधिकारी नाना मोरे, एल. एम काळे, संबंधित गटलिपिक, एमएसएफ जवान उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;