पालिका एमएमआरडीएला आता 500 कोटी देणार, पालिका आयुक्तांचा दुजोरा

पालिका एमएमआरडीएला आता 500 कोटी देणार, पालिका आयुक्तांचा दुजोरा

मुंबई महानगरपालिका एमएमआरडीएला अखेर 500 कोटी देण्यास तयार झाली आहे. पालिकेने एमएमआरडीएला ‘विकास शुल्क’ म्हणून दोन हजार कोटी याआधीच  दिले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने मागितलेले तीन हजार कोटी आता पुन्हा देणे शक्य नाही. त्यामुळे पालिका 500 कोटी रुपयेच देईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी याला दुजोरा दिला आहे.

मेट्रो खर्चातील वाटा उचलण्याचे निर्देश राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही महामंडळांना दिले  आहेत. त्यानुसार पालिकेने याआधी दोन हजार कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित रक्कम द्यावी अशी मागणी एमएमआरडीएने पालिकेकडे केली होती. मात्र लगेचच पैसे देणे शक्य होणार नाही, अशी भूमिका पालिकेने घेतली होती. आता मात्र या भूमिकेत बदल झाला असून पैसे देण्यास पालिकेने तयारी दर्शवली आहे.

मेट्रो खर्चाची प्रतिपूर्ती द्या

एमएमआरडीए मुंबई आणि परिसरात 13  मेट्रो प्रकल्प राबवत आहे. त्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च आहे. त्यासाठी विविध देशी-विदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) मालकीचे भूखंड हा एमएमआरडीएच्या मालकीचा आतापर्यंत  मुख्य स्रोत होता. परंतु मधल्या काळात अनेक भूखंडाची विक्री केली, काही भूखंड भाडय़ाने देण्यात आले. साहजिकच भूखंडाचा साठा  कमी झाला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला निधीसाठी प्रयत्न करावे लागत असून पालिकेकडे आता पैसे मागत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;