मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मनोज जरांगे यांचे शनिवारपासून कठोर उपोषण

मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, मनोज जरांगे यांचे शनिवारपासून कठोर उपोषण

राज्य सरकारने मराठा समाजाचा विश्वासघात केला आहे. एकीकडे गोड बोलायचे आणि दुसरीकडे केसाने गळा कापायचा असे सरकारचे धोरण असल्याचा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून कठोर उपोषण करणार असल्याचे जाहीर केले. उपोषणापूर्वी सरकारने काही चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता, परंतु सरकारची इच्छाशक्तीच नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता सर्व मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण कोणत्याही परिस्थितीत मागे घेणार नाही, असा निर्धारही जरांगे यांनी बोलून दाखवला.

मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत चार वेळेस उपोषण केले. प्रत्येक वेळेस सरकारने मुदत मागून घेत आरक्षणाचे भिजत घोंगडे कायम ठेवले. मराठा समाजाची मागणी नसतानाही वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. सगेसोयर्‍यांचा अध्यादेश काढूनही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही. मुळात मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. सरकारच्या वतीने बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत काल भेटायला आले होते. त्यांनी मुंबईत चर्चा करण्यासाठी या असा निरोप दिला. परंतु मी नकार दिला, असेही ते म्हणाले. अशा बैठका म्हणजे वेळ काढण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या

ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण
मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे
सगेसोयर्‍यांच्या अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी
मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत
ईडब्ल्यूएस पुन्हा सुरू करण्यात यावे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;