पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, दिल्लीत FIR दाखल, कारणे दाखवा नोटीसही बजावली

पूजा खेडकरवर UPSC ची मोठी कारवाई, दिल्लीत FIR दाखल, कारणे दाखवा नोटीसही बजावली

वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरवर आता केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC कडून कारवाईसाठी पावलं उचलण्यात येत आहे. UPSC पूजा खेडकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आयएएस केडर रद्द करण्यासाठी आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. खोटी ओळख, बोगस पत्ता आणि पालकांची नावं बदलली यावरून UPSC ने मोठी कारवाई केली आहे.

खासगी गाडीवर अंबर दिवा, कॅबिन, दिव्यांग असल्याची खोटी कागदपत्रे, खोटा पत्ता यासह अनेक कारणांमुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वादात आली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल UPSC ने घेतली आहे. UPSC ने या प्रकरणी एक पत्रक जारी करत माहिती दिली आहे. पूजा खेडकरचं आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी तिला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

आयएएस पद मिळवण्यासाठी पूजा खेडकरने जे गैरप्रकार केले आहेत ते गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत. हे लक्षात घेऊन तिच्यावर UPSC कडून दिल्ली पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे पिस्तुल दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकरच्या आईला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्या वडिलांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. यामुळे पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;