बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीचे 21 व्या वर्षी निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

बॉलीवूड अभिनेत्याच्या मुलीचे 21 व्या वर्षी निधन; कर्करोगाशी झुंज अपयशी

बॉलीवूडच्या टी सिरीज या कंपनीचे सह-मालक आणि अभिनेते कृष्णा कुमार यांच्या मुलीचे गुरुवारी निधन झाले. तीशा कुमार असे त्यांच्या मुलीचे नाव असून ती केवळ 21 वर्षांची होती. कॅन्सरशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली.

काही दिवसांपूर्वीच तीशाला कर्करोगाचे निदान झाले होते. यानंतर तिच्यावर उपचारही सुरू होते. पुढील उपचारासाठी कृष्णा यांनी तीशाला जर्मनीला नेले. जर्मनीतील रुग्णालयात गुरूवारी उपचारादरम्यान तिने प्राण सोडला. मुलीच्या निधनामुळे कृष्णा कुमार यांना कन्याशोक झाला असून त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अभिनेते कृष्णा कुमार चित्रपटसृष्टीत सक्रिय असले तरी त्यांची मुलगी तीशा मात्र या सगळ्यापासून लांबच होती. अॅनिमल या चित्रपटाच्या एका पार्टीत तीशा वडिलांसोबत दिसली होती. त्यामुळे तीशा कुमारच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

कोण आहेत कृष्णा कुमार? 

अभिनेता आणि टी-सीरिज या कंपनीचे सह-मालक कृष्णा यांनी नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 1995 मधील बेवफा सनम या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. टी- सिरीज कंपनीचे मालक गुलशन कुमार हे कृष्णा यांचे मोठे भाऊ आहेत. गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर कृष्णा यांनीच टी-सीरिजची धुरा सांभाळली.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;