“पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा…”, अमोल कोल्हेंचा अजितदादांवर हल्लाबोल
महायुती सरकारच्या काळ्या कारनाम्यांचा मुद्देसूद लेखाजोखा सांगणा-या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार’ पक्षातर्फे प्रकाशित ‘महायुतीचे काळे कारनामे’ या पुस्तिकेचे अनावरण आज प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार अमोल कोल्हेही यावेळी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी मिंधे सरकारवर हल्ला चढवला. तसेच अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये कशाप्रकारे डुबलेले आहे. हे आज प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांमधून दिसून येते. दिल्लीश्वरांना खुश करण्यासाठी महाराष्ट्रातले महायुतीतले सरकार काम करतंय आणि हे करत असताना महाराष्ट्र ज्यांचा आहे. त्या सर्वसामान्य युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, सामान्य, मध्यमवर्गीयांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांच्या स्वप्नातला हा महाराष्ट्र काय आहे? याचा उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्कीच न्याय देईल. तुमच्या स्वप्नातील महाराष्ट्र कसा असावा याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
पिंक जॅकेट घालून गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा राज्यासमोर असलेलं काळं भविष्य बदलविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या बरोबर सरकारने अनेकदा संवाद साधला. मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलले. देवेंद्र फडणवीस ओबीसी लोकांशी बोलले आहेत. पण कोण कोणाशी काय बोलले हे आम्हाला कळत नाही. कोणी कोणाला काय कमिटमेंट दिली हे माहित नाही. सत्ताधारी यांनी विश्वासात घेतले नाही.
महायुतीचे काळे कारनामे! राष्ट्रवादीचं पुस्तक, काळे फुगे फोडून राज्य सरकारचा निषेध
यावेळी लंडनहून आणलेल्या वाघनखांबाबतही खासदार अमोल कोल्हे यांनी मार्मिक भाष्य केले. सरकार म्हणते की वाघनखे महाराजांनी वापरली आहे. पण संग्रहालय म्हणते की ती खात्रीलायक सांगता येत नाही. नेमके काय आहे? असा सवाल अमोल कोल्हे यांनी केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List