तरूणांना नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री, विटा पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

तरूणांना नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री, विटा पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश; तिघांना अटक

शरीरसौष्ठववाढीचे कारण देऊन नवीन युवक व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना मेफेनटरमाइन सल्फेट या नशेच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री प्रकरणाचा विटा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

दिलीप बाबूराव ठोंबरे (वय 48, रा. नेहरूनगर, विटा), सुशांत हिंदूराव जाधव (वय 27, रा. पुणदी रोड, तासगाव. मूळगाव, हातनोली) व अमरदीप रामचंद्र भंडारे (वय 40, रा. कार्वे, ता. खानापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 8 हजार रुपये किमतीच्या 16 सीलबंद बाटल्या जप्त केल्या.

विटा शहर व आसपास महाविद्यालय परिसरात युवकांना मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनमुळे शरीरसौष्ठव वाढत असल्याचे सांगून तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री केली जात असल्याची तक्रार विटय़ाचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना मिळाली. त्यानंतर हवालदार उत्तम माळी यांच्यासह पोलीस पथकाने सापळा लावला. त्यावेळी विटा येथे कंपाउंडरचे काम करणारा दिलीप ठोंबरे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या 16 सीलबंद बाटल्या सापडल्या.

पोलिसांनी ठोंबरे याची कसून चौकशी केली असता, या प्रकरणात त्याला मदत करणाऱया सुशांत जाधव व अमरदीप भंडारे या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. त्यामुळे पोलिसांनी सुशांत जाधव याला तासगावमधून, तर अमरदीप भंडारे याला कार्वे येथून ताब्यात घेऊन अटक केली. विटा पोलिसांनी तरुणांना बेकायदेशीर नशेच्या इंजेक्शनची विक्री करणाऱया टोळीचा पर्दाफाश केला आहे. मात्र, हे इंजेक्शन संशयित आरोपी कोठून खरेदी करीत होते, याचा तपास करून त्यांच्याही मुसक्या आवळण्याचे विटा पोलिसांसमोर आव्हान आहे.

इंजेक्शनचा दुष्परिणाम काय?

z मेफेनटरमाइन सल्फेट या इंजेक्शनचा वापर हा हृदयदाब वाढविण्यासाठी केला जातो. एमडी आणि एमबीबीएस पदवी असलेल्या डॉक्टरांच्या प्रिक्रिप्शनशिवाय या इंजेक्शनची विक्री करता येत नाही. कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध वापरल्यास विषारी द्रव्यांचे दुष्पपरिणाम होऊन व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;