तिरुपती मंदिरात 670 कोटींचे दान
तिरुपति मंदिरात 6 महिन्यात 670 कोटींचे दान जमा झाले आहे. तिरुमाला वेंकन्ना मंदिरात भक्तांकडून येणाऱया दानात दिवसागणिक वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात 116.46 कोटी, फेब्रुवारीत 111.71 कोटी, मार्चमध्ये 118.49 कोटी, एप्रिल मध्ये 101.63 कोटी, मे महिन्यात 108.28 कोटी आणि जुने मध्ये 113.64 कोटी रुपये जमा झाले आहेत. टीटीडी ने 24 बँक खात्यात जमा झालेली रक्कम आणि सोन्याची माहिती दिली आहे. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत 17,816.15 कोटी रुपये जमा झाले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List