Nagar News: गुन्हे शाखेविरोधात खासदार लंके यांचे सोमवारपासून उपोषण

Nagar News:    गुन्हे शाखेविरोधात खासदार लंके यांचे सोमवारपासून उपोषण

पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याने खासदार नीलेश लंके हे त्यांच्या सहकाऱयांसह सोमवारपासून (दि. 22) पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत. खासदार लंके यांनी यासंदर्भात आज पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले असून, उपोषणासाठी लाऊडस्पीकर, तसेच मंडप लावण्यासंदर्भात परवानगी मागितली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत 11 जुलै रोजी पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते. मात्र, त्याची अद्यापि कुठलीही दखल घेतली गेली नाही किंवा संबंधितांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण व आपले सहकारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या तक्रारीसंदर्भात खासदार लंके यांनी 11 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष वेधले होते. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक सोपान गोरे व इतर कर्मचारी हे राजरोसपणे हप्ते घेत आहेत. हप्ते गोळा करण्याकामी रवींद्र आबासाहेब कर्डिले मदत करीत आहेत. रवींद्र कर्डिले यांची शिर्डी येथे सुरक्षा विभागात नेमणूक असतानाही तात्पुरत्या स्वरूपात त्यांची सायबर सेल नगर येथे बदली करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल या दोन्ही आस्थापना वेगवेगळ्या असून, दोन्ही विभाग स्वतंत्र असताना या शाखांचा कार्यभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे देण्यात आला आहे. आहेर यांच्याकडे दोन्ही शाखांचा कार्यभार हा फक्त आर्थिक लोभापायी असल्याचा आरोप खासदार लंके यांनी पत्रात केला आहे.

पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या स्थगित ठेवा

z मागील वर्षी प्रामाणिक पोलीस कर्मचाऱयांवर मोठय़ा प्रमाणावर अन्याय झाला आहे. या बदल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात अनियमितता झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जोपर्यंत उपोषण स्थगित होत नाही, तोपर्यंत पोलीस कर्मचाऱयांच्या बदल्या तात्पुरत्या स्थगित कराव्यात, असेही खासदार लंके यांनी पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या पत्रात सूचित केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;