Chandrapur news : आईने मोबाईल हिसकावल्याने तरुणीने घेतला गळफास

Chandrapur news : आईने मोबाईल हिसकावल्याने तरुणीने घेतला गळफास

हल्लीची पिढी मोबाईलशिवाय राहू शकत नाही असे बोलले जाते. उठता, बसता, जेवताना, झोपताना आणि अगदी प्रातर्विधीला जातानाही मोबाईल सोबत नेला जातो. मोबाईलवर रिल्स पाहणे, मित्रांसोबत चॅटिंग करणे हेच सर्वस्व असल्याचे तरुण मानतात आणि मोबाईलच्या आहारी जातात. मोबाईलचे हेच व्यसन जीवघेणेही ठरू शकते हे अनेकदा समोर आले आहे. असाच एक प्रकार चंद्रपुरात घडला असून आईने हातातून मोबाईल हिसकावून घेतल्याच्या रागातून तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव खडतकर येद येथे आईने हातातून मोबाईल हिसकावल्याच्या रागातून तरुणीने गळफास घेतला. करिष्मा प्रभाकर माने (वय – 20) असे मयत तरुणीचे नाव आहे. राहत्या घरी गळफास घेत तिने आत्महत्या केल्याने माने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच शेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास योगेंद्र सिंह यादव हे करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;