Mumbai News : रागाने पाहिले म्हणून राग अनावर, जिम ट्रेनरकडून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

Mumbai News : रागाने पाहिले म्हणून राग अनावर, जिम ट्रेनरकडून तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण

मुंबईतील मुलुंड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिममध्ये आलेल्या तरुणाने रागाने पाहिले म्हणून ट्रेनरने त्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मारहाणीत तरुण जखमी झाला आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘आज तक’ने दिलेल्या माहितीनुसार, पीडित 20 वर्षीय तरुण बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे जिमला गेला होता. तरुणासोबत इतर लोक तेथे जिम करत होते. जिम करत असतानाच अचानक जिम ट्रेनरने लाकडी दांड्याने त्याला मारहाण करण्यास सुरवात केली.

जिममधील इतर लोकांनी मध्यस्थी करत तरुणाला वाचवले. मात्र तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करत जिम ट्रेनरला अटक केली. आरोपीची चौकशी केली असता तरुणाने आपल्याकडे रागाने पाहिले म्हणून त्याला मारल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;