प्रसाद लाड…कोण हा बांडगूळ? मनोज जरांगेंनी धू धू धुतले!

प्रसाद लाड…कोण हा बांडगूळ? मनोज जरांगेंनी धू धू धुतले!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार प्रसाद लाड यांना मनोज जरांगे-पाटील यांच्याशी पंगा घेणे महागात पडले. मनोज जरांगे यांनी लाड यांना धू धू धुतले! ‘प्रसाद लाड… कोण हा बांडगूळ?’ असा सवाल करत ‘‘पैशाची मस्ती मराठय़ांना दाखवू नका. फडणवीसांची गुलामी करताय, तीच तुमची लायकी आहे!’’ असे खडे बोलही जरांगे यांनी लाड यांना सुनावले.

भाजपचे आमदार आणि फडणवीसांचे विश्वासू प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना फडणवीसद्वेषाचा रोग झाल्याची वटवट केली होती. आज पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी लाड यांची सालटीच काढली. हा कोण बांडगूळ आहे? फडणवीसांचा माणूस आहेस ना, मग त्याची धुणी धूत बस. आमच्या नादाला लागू नको, असा खरमरीत इशारा जरांगे यांनी दिला.

‘‘फडणवीसांवर टीका केल्याचा एवढा राग येतो. आमची मुले आरक्षण नसल्यामुळे जगाच्या स्पर्धेत किती मागे पडली आहेत. तुम्हाला याची जाणीव आहे का? कुणबी प्रमाणपत्र असतानाही ठाण्याच्या पोलीस अधीक्षकांनी मराठा मुलांना भरती प्रक्रियेतून बाहेर काढले. हिंमत असेल तर यावर बोला!’’ असे आव्हान या वेळी मनोज जरांगे यांनी दिले. मी जातीसाठी लढत आहे. जातीचे भले व्हावे असे मला वाटते, असे खडे बोल जरांगे यांनी प्रवीण दरेकर यांनाही सुनावले. दरेकर यांनी आंतरवालीत यावे, समोरासमोर चर्चा करावी, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;