शिवसेनेला देणगी स्वीकारण्यास परवानगी, बँक खाते उघडण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची अनुमती

शिवसेनेला देणगी स्वीकारण्यास परवानगी, बँक खाते उघडण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाची अनुमती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या नावाने बँक खाते उघडण्यास अनुमती आणि कलम 29ब-नुसार देणगी स्वीकारण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. गेल्याच आठवडय़ात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला अशीच परवानगी देण्यात आली आहे.

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यामुळे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मशाल या चिन्हावर निवडणुका लढविण्यात आल्या. महाराष्ट्रात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. या निवडणुकांतही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला लोकप्रतिनिधी कायदा, 1951अंतर्गत राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात यावी. तसेच बँक खाते उघडण्यास अनुमती देऊन पक्षाच्या नावे देणगी स्वीकारण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते सुभाष देसाई आणि शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव पुमार यांची भेट घेऊन केली होती. ही  मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.

मशाल चिन्हाबाबत स्पष्टता आणणार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मशाल हे निवडणूक चिन्हे निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. मशाला चिन्हाशी साधर्म्य असणारी अन्य काही चिन्ह मतपत्रिकेवर असल्याने मतदारांचा गोंधळ उडत असल्याचे लोकसभा निवडणुकी दरम्यान निदर्शनास आले आहे. त्यामुळे मशाल चिन्हाबाबत अधिक स्पष्टता यावी अशी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली. त्यावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आयोग निश्चितच याबाबत विचार करेल, असे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;