विधानसभेसाठी राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू

 विधानसभेसाठी राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. आजच्या दिवसात राष्ट्रवादी काँग्रेससह भारतीय जनता पक्ष, मिंधे गट आणि अजित पवार गटाच्या बैठका पार पडल्या. मतदारसंघांच्या आढाव्याबरोबरच निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत या बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पुणे येथे पार पडली. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे वाढलेली जबाबदारी,मतदारसंघांमधील परिस्थिती, मतदारांचा कल आदी मुद्दय़ांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

–  अजित पवार गटानेही आज पुण्यामध्ये बैठक घेऊन चर्चा केली. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावली होती. नव्या शहर अध्यक्षपदासाठी इच्छुकांची यादी बनवली तसेच आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱयांच्या समस्या ऐपून घेणे यासंदर्भात अजित पवारांनी सूचना दिल्या.

–  भाजपच्या कोअर कमिटीची बैठक नरिमन पॉइंट येथील प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला पक्षाचे प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनपुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी विधानसभानिहाय मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;