IND Vs SL 2024 : रोहित, विराटने अखेर गौतम गंभीरच्या शब्दाचा मान राखला

IND Vs SL 2024 : रोहित, विराटने अखेर गौतम गंभीरच्या शब्दाचा मान राखला

टीम इंडियाच्या आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली उपस्थित नसणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र या सर्व चर्चांना आता पूर्ण विराम लागला आहे. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध एकदीवसीय मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळताना दिसणार आहेत.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये तीन टी-20 आणि तीन एकदीवसीय सामन्यांची मालीका ऑगस्टमध्ये पार पडणार आहे. परंतु या मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु या दौऱ्यासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेमध्ये खेळताना दिसणार आहेत. विराटने BCCI ला या संदर्भात माहिती दिली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेमध्ये खेळावे अशी मुख्य प्रसिक्षक गौतम गंभीर यांची प्रमुख मागणी होती. त्यामुळे त्यांच्या मागणीचा मान ठेवत रोहित आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेसाठी उपस्थित असणार आहेत.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे 27 जुलै पासून होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार पदाचं कोड अजून सुटलेलं नाही. परंतु सूर्यकुमार यादवच नाव कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;