Stree 2 Trailer : हसवता हसवता घाबरवणारा ‘स्त्री 2’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? चित्रपटाची वाढली उत्सुकता

Stree 2 Trailer : हसवता हसवता घाबरवणारा ‘स्त्री 2’चा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? चित्रपटाची वाढली उत्सुकता

अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री’ या चित्रपटाने 2018 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता याच चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वी ‘स्त्री 2’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर तुम्हाला हसवता हसवता घाबरवून टाकणारा आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हा ट्रेलर पहिल्या भागापेक्षाही जास्त घाबरवणारा आहे. मात्र त्याचसोबत त्यात विनोदाचाही तडका आहे. श्रद्धा कपूरने ‘स्त्री 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे. श्रद्धाने हा ट्रेलर शेअर करत लिहिलं, ‘हा पहा ट्रेलर… भारतात ज्या गँगची सर्वाधिक प्रतीक्षा करण्यात आली, तो अखेर परत आला आहे. ही गँग चंदेरीमधील नवीन भिती संपवण्यासाठी लढणार आहे.’ या सीक्वेलमध्ये राजकुमार राव, श्रद्धा कपूर, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या भूमिका आहेत. त्याचसोबत त्यात आणखी एका कलाकाराचा नव्याने समावेश झाला आहे. या कलाकराचं नाव आहे अभिनेत्री तमन्ना भाटिया.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

‘स्त्री 2’च्या ट्रेलरमध्ये कथेची झलक पहायला मिळते. या चित्रपटाची कथा तिथूनच सुरुवात होते जिथे पहिल्या भागात एका महिलेची आत्मा चंदेल गावातील पुरुषांशी सूड घेते. त्यानंतर तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करून तिला शांत केलं जातं. आता ‘स्त्री 2’मध्ये एक पुरुष आत्मा दाखवण्यात आला असून तो गावातील मुलींना संपवण्याचा प्रयत्न करतो. अखेर गावकरी हे विकी आणि त्याच्या गँगची मदत घेतात. या ट्रेलरमधील संवाद हसायला भाग पाडतात तर काही दृश्ये घाबरगुंडी उडवतात. एकंदरीत हा ट्रेलर प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचून आणण्यात यशस्वी ठरेल, असं दिसतंय. श्रद्धाच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देऊन चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;