जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची तब्येत बिघडली आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला फूड इन्फेक्शन झाले असून तिला साऊथ मुंबईच्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल केल्याने तिच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीने एबीपी न्यूजला याबाबत माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जान्हवी कपून चेन्नईला गेली होती आणि मंगळवारी तिथून परततना विमानतळावर तिने काही खाल्ले होते. मात्र ज्यावेळी ती घरी आली त्यावेळी तिची तब्येत बिघडली होती आणि बुधवारी तिला प्रचंड अशक्तपणा जाणवायला लागलाय अखेर बुधवारी डॉक्टरांनी तिला अॅडमीट करायला सांगितले.
आता जान्हवीची तब्येत स्थीर असून शुक्रवारपर्यंत तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List