रिचा चड्ढाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन; अभिनेत्रीने दिली ‘गुड न्यूज’

रिचा चड्ढाच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन; अभिनेत्रीने दिली ‘गुड न्यूज’

अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. 16 जुलै रोजी रिचाने मुलीला जन्म दिला. रिचा आणि अली यांनी एकत्र स्टेटमेंट शेअर करत मुलीच्या जन्माची गोड बातमी चाहत्यांना दिली. फेब्रुवारी महिन्यात रिचाने गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. ’16 जुलै रोजी आमच्या कुटुंबात एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं. बाळाच्या जन्माने आमच्या कुटुंबीयांवर आनंदाचा वर्षाव झाला आहे. तुम्ही दिलेल्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल आम्ही सर्व शुभचिंतकांचे आभार मानतो’, अशा शब्दांत रिचा आणि अलीने भावना व्यक्त केल्या आहेत.

नुकतंच रिचाने सोशल मीडियावर तिच्या गरोदरपणातील खास फोटोशूट पोस्ट केलं होतं. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं, ‘प्रकाशाच्या किरणाशिवाय इतकं निर्मळ प्रेम या जगामध्ये कोण आणू शकतं? अली फजल, या आयुष्यातील अविश्वसनीय प्रवासात माझा जोडीदार बनल्याबद्दल धन्यवाद. प्रकाशाचा योद्धा, करुणा, सहानुभूती आणि प्रेमाचा अंश आपण या जगात आणुयात.’ या पोस्टच्या अखेरीस रिचाने स्पष्ट केलं होतं की तिने कमेंट्स ऑफ केले आहेत. म्हणजेच तिच्या या पोस्टवर कोणीच कमेंट करू शकणार नाही. ‘ही सर्वांच प्रायव्हेट गोष्ट मी पोस्ट करत असल्याने कमेंट्स बंद केले आहेत’, असं तिने लिहिलं होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Richa Chadha (@therichachadha)

‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर रिचा आणि अलीची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर हळूहळू प्रेमात झालं. 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान रिचा आणि अलीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. रिचा आणि अली यांचा धर्म वेगळा असून लग्नाच्या वेळी काही समस्या निर्माण झाल्या का, याविषयी तिने एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं. “तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल जर ठाम राहिलात आणि तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले तर बाकी कोणत्याच गोष्टींनी फरक पडत नाही. माझ्या मते माणूस हा सर्वांत आधी माणूस असतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता, तेव्हा त्यात कोणतेच फिल्टर्स नसतात. तुम्ही प्रेमात असता, तेव्हा प्रेम ही एकच भावना महत्त्वाची असते,” असं ती म्हणाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;