उत्तर प्रदेशात मोठी रेल्वे दुर्घटना; चंदीगड एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरुन घसरले!
उत्तर प्रदेशात गुरुवारी दुपारी मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. चंदीगडहून गोरखपूरला जाणाऱ्या चंदीगड एक्सप्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नाही. मात्र या दुर्घटनेमुळे रेल्वेसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या मार्गावरील सर्व रेल्वेसेवा ठप्प झाल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. रुळावरुन घसरलेले डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
गोंडापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या जिलाही रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. गोंडा येथून बचाव पथक रवाना झाले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून तात्काळ मदतकार्य सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List