‘इंदुबाई’ बनून हॉटेलमध्ये लपून बसली; IAS पूजा खेडकरची आई मनोरमाला पोलिसांनी कशी शोधली?

‘इंदुबाई’ बनून हॉटेलमध्ये लपून बसली; IAS पूजा खेडकरची आई मनोरमाला पोलिसांनी कशी शोधली?

वादग्रस्त प्रोबेशनरी आयएएस पूजा खेडकर यांच्या फरार आईला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील पौड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाडमधील पाचाड येथील एका हॉटेलमधून मनोरमाला ताब्यात घेतले. या हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर या ‘इंदुबाई’ बनून रहात असल्याची माहिती समोर आली आहे.

मनोरमा खेडकर यांनी रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर सदर शेतकऱ्याने खेडकर दाम्पत्याविरोधात तक्रार केली. याप्रकरणी पुण्यातील पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्याविरोधीत गुन्हा दाखल केला. तेव्हापासून दोघेही बेपत्ता होते. शोध घेत असताना खबऱ्यामार्फत पोलिसांना मनोरमा खेडकर या महाडमधील पाचाड येथील एका हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक मनोरमाला ताब्यात घेण्यासाठी महाडकडे रवाना झाले.

मनोरमा खेडकर एका मुलासोबत महाडच्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. बुधवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास हुंडाई कंपनीच्या कारने (क्र. एमएच 14, एसयू 4877) त्या हॉटेलमध्ये आल्या होत्या. दोघांनीही आम्ही मायलेक असल्याची माहिती हॉटेल मालकाला दिली होती.

यासंबंधी हॉटेल मालक अनंत यांनी माहिती देताना सांगितले की, मनोरमा यांनी आपले नाव इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे आणि त्यांच्यासोबच्या मुलाने दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे असे सांगितले होते. हॉटेलच्या रजिस्टरमध्येही तशी नोंद करत आम्ही मायलेक असल्याचे त्यांनी सांगितले. दोघांनी एक रुम बूक केली. मात्र बुधवारी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास महिला कॉन्सेटबलसह पोलिसांचे एक पथक येथे आले आणि मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेऊन सकाळी साडे सहाच्या सुमारास निघून गेले.

दरम्यान, रिव्हॉल्व्हर रोखून शेतकऱ्याला दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस मनोरमा यांचा शोध घेत होते, मात्र त्या वारंवार पोलिसांना गुंगारा देत होत्या. त्यांचा फोनही बंद लागत होता. पोलिसांच्या नोटिसीला त्यांनी उत्तर दिले नव्हते. त्यामुळे पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर मनोरमा यांना महाडमधून अटक करण्यात आली असून त्यांचे पती दिलीप खेडकर यांचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. मात्र ती जमीन ताब्यात घेताना त्यांनी शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न केल्यामुळे गावकऱ्यांनी आक्षेप घेतला आणि त्यातून हा वाद उद्भवला, असे सांगितले जात आहे. मला कायदा सांगू नका, सातबाऱ्यावर माझे नाव आहे, असे त्या शेतकऱ्यांना दरडावून सांगताना दिसत आहेत. तसेच शेतकऱ्यांना ओरडत असताना त्यांनी त्यांच्यावर बंदूक देखील रोखली होती. त्यांचा रिव्हॉल्व्हर रोखून दमबाजी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;