अजय महाराज बारस्कर यांची कार अज्ञातांनी पेटवली, पंढरपूरमधील घटना

अजय महाराज बारस्कर यांची कार अज्ञातांनी पेटवली, पंढरपूरमधील घटना

मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांच्यावर विखारी टीका करणारे अजय महाराज बारस्कर यांची कार बुधवारी अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली.बारस्कर महाराज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आले होते. भक्तीसागर येथे मुक्कामी असताना त्यांची कार पेटवून दिल्याची घटना घडली. याप्रकरणी बारस्कर महाराज यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पेटवलेली कार टोयोटा कंपनीची असून त्याची किंमत 10 लाख रुपये असल्याचे बारस्कर महाराज यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दरम्यान, बारस्कर महाराज यांनी या जाळपोळीमागे जरांगे-पाटील यांच्या समर्थकांचा हात असल्याचा थेट आरोप केला आहे. “मराठा आरक्षणावर जरांगे-पाटील यांचे आपण पितळ उघडे पाडले म्हणून त्यांच्या समर्थकांच्या मला सतत धमक्या येत असतात. माझी गाडी त्यांनीच जाळली आहे. पोलिसांनी मी तसे सांगितले”, अशी प्रतिक्रिया बारस्कर महाराज यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;