‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत मोठा ट्विस्ट; एजे-लीलाच्या नात्यात..
झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळाली. राकेश बापट आणि वल्लरी लोंढे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेचं कथानक आता रंजक वळणावर आलं आहे.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत लीला आणि एजे पाचपरतावणीसाठी लीलाच्या माहेरी गेले असताना एजेला एक रात्र तिथे राहावं लागतं. एजेला काही गोष्टींचा त्रास होतोय पण काही गोष्टी त्याला नव्याने कळतात.
लीलाच्या आई बाबांसमोर एजे आणि लीला सुखी जोडपं असल्यासारखे वावरत आहेत. एजे असं वागत आहेत हे पाहून लीलाला खूप बरं वाटतं. पण किशोर तिला सतत आठवण करून देत आहे की तुला अंतराच्या मृत्यूचे पुरावे शोधायचे आहेत. त्यामुळे ती एजेकडे सतत साशंक नजरेने पाहत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List