चीनच्या जिगोंग शहरात शॉपिंग मॉलमध्ये अग्नीतांडव, 16 जणांचा होरपळून मृत्यू

चीनच्या जिगोंग शहरात शॉपिंग मॉलमध्ये अग्नीतांडव, 16 जणांचा होरपळून मृत्यू

चीनमधील जिगोंग शहरात एका 14 मजली शॉपिंग मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. आगीचे माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत 75 जणांना सुरक्षित बाहेर काढले.

‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या माहितीनुसार, सदर 14 मजली मॉलमध्ये डिपार्टमेंटल स्टोर, ऑफिस, रेस्टरन्ट, थिएटर आहे. मॉलच्या खालच्या मजल्यांवरून अचानक धूर येऊ लागला. त्यानंतर बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. आग इतकी भयानक होती की अग्नीशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवणे अशक्य होते. अखेर ड्रोनच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आल्याची माहिती चीनच्या सरकारी मीडियाने दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;